नागपूर :- दिनांक ०९.०३.२०२४ चे ०९.३० वा. च्या सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, लॉट नं. १२२, शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दानीश आलम मेहबुब आलम, वय ३७ वर्षे यांचे कडुन आरोपी तोहीद खान वल्द सलमान खान वय ३५ वर्ष रा. शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर याने ५,०००/- रू उधार घेतले होते. याच उधारीचे पैश्याचे कारणावरून आरोपीने फिर्यादीस लाकडी चल्लीने पायावर, छातीवर, कानावर मारून जखमी केले, जखमीचा उपचार मेडीकल हॉस्पीटल येथे करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि. पाटील यांनी आरोपीविरूध्द कलम ३२४, ५०४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ दखल घेवुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.