मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना  यंत्रणांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी

मुंबई इन ट्रान्झिट‘ कार्यशाळेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

 

 मुंबईदि. 17 : सामान्य माणसाच्या जीवनमानात सुलभता यावी यासाठी एमएमआरडीएबृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा विकास करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावीअशा सूचना पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

            बृहन्मुंबई महानगरपालिकासामान्य नागरिकनियोजकतज्ज्ञबेस्ट उपक्रम यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्पपायाभूत सुविधांची माहिती आणि फायदे या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणातर्फे मुंबई इन ट्रान्झिट‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री आदित्य ठाकरेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीएम एम आर डी ए चे सहआयुक्त राहुल कर्डिले यांचेसह मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. 

            मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांशी सकारात्मक बदलाबाबत सातत्याने संवाद साधला जाईलजेणेकरून सामान्य मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            मुंबई इन ट्रान्झिट‘  या कार्यशाळेत मेट्रो लाईन २ ‘अ’ आणि ७ चा पश्चिम उपनगरांवर होणारा परिणामबहुवाहतूक एकात्मिकरणअंतिम गंतव्यस्थान जोडणीएकात्मिक तिकिटीकरण प्रणाली आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

            मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्गाचा सुमारे ३३७.१ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत आराखडा तयार केला आहेत्याची नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीस मेट्रो बृहत आराखड्यामधील मेट्रो मार्ग-१ (वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर) या ११.८० कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. मेट्रो २ ‘अ’ आणि ७ चे काम पुर्णत्वाकडे असून, लवकरच टप्प्या-टप्प्याने खुले करण्याचे नियोजन आहे. तसेच मेट्रो मार्ग २ ‘ब’ ४४ ‘अ’७अ आणि  ९ चे बांधकाम सुरु आहे.  मेट्रो मार्ग १०१११२ ची प्रत्यक्ष अंमलबजावणीची कामे लवकरच सुरु होणे अपेक्षित आहेत. मेट्रो मार्ग ८१३ व १४ चे नियोजन प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली.मेट्रो २ ‘अ’ आणि ७ लवकरच  खुली करण्याचे नियोजन असल्याने या मार्गिकांची माहिती मुंबईकरांना व्हावी या दृष्टीने प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समाजवादी पार्टी के संरक्षक मुलायम सिंह यादव अपनी पहली चुनावी रैली में दिखाई दिए

Thu Feb 17 , 2022
समाजवादी पार्टी के संरक्षक मुलायम सिंह यादव ने एक चुनावी रैली में पहली बार उपस्थिति दर्ज कराते हुए गुरुवार को अपने बेटे अखिलेश यादव के लिए वोट मांगा और वादा किया कि उनकी पार्टी लोगों की आकांक्षाओं को पूरा करेगी। यादव ने कहा कि लोग चाहते हैं कि गरीबी और बेरोजगारी की समस्या का समाधान हो और इन मुद्दों पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!