नागपूर येथे १९ डिसेंबर रोजी भाजपा प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष बैठक प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

नागपूर :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी हे उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे उदघाटन होणार आहे. पक्षाचे सर्व प्रमुख प्रदेश पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर होणाऱ्या विविध सत्रांमध्ये विद्यमान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. पक्षाच्या संघटनेकडून राज्यात राबविल्या जाणाऱ्या धन्यवाद मोदीजी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, नव मतदार नोंदणी या सारख्या वेगवेगळया अभियानाबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाची बेघरांसाठी शोधमोहीम , बेघर निवाऱ्यात करण्यात येते व्यवस्था

Sat Dec 17 , 2022
चंद्रपूर  :- उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली. अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com