नागपूर, दि. 31 : संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालयातील प्रदर्शन सहायक रमेश रामचंद्र डिकवार हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. माहिती विभागात त्यांनी 39 वर्षे प्रदीर्घ सेवा केली आहे. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी समारंभात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी श्री. डिकवार यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला. समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक श्रीमती अपर्णा यावलकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
रमेश डिकवार यांनी गडचिरोली, सातारा, चंद्रपूर, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.