उद्योग उभारणी, शासकीय योजना व अनुदानाबाबत प्रशिक्षण

नागपूर,दि.17 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विद्यमाने शहरात लघु उद्योग उभारणी, शासकीय योजना व अनुदान यावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी लघु उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींच्या माहितीसह स्वत:चा स्वयंरोजगार सुरु करावा, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
या प्रशिक्षणात लघु उद्योग कसा उभारावा, उद्योगक्षेत्रातील विविध संधी, लघु उद्योग उभारणीतील टप्पे, बाजारपेठ पाहणी व उत्पादनाची निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून केली जाणारी मदत, शासकीय योजना व अनुदान आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व प्रवेशासाठी एमसीईडी, उद्योग भवन, पहिला माळा, सिव्हिल लाईन, नागपूर येथे कार्यक्रम सहायक निलेश बोळे-9420014879 किंवा प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुळकर्णी-9403078760 यांचेशी 20 डिसेंबरपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आजार व व्यसनाने ग्रासित व्यक्तीने तत्काळ तपासणी करावी : आर. विमला

Fri Dec 17 , 2021
-लोकसहभागातून मोहिम राबवा -खाजगी डॉक्टर्स व केमिस्टचे सहकार्य अपेक्षित नागपूर,दि.17 : एचआयव्ही, मधुमेह, उच्च रकतदाब, कॅन्सर व तंबाखु, वीडी, दारुचे व्यसन आदी व्यसनाधीन व्यक्तीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकार शक्ती फार कमी असते त्यांना क्षयरोग कोविड 19 अशा आजाराची लागण लवकर होवू शकते. या आजार व व्यसन ग्रस्त व्यक्तीने तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. जिल्हास्तरीय टिबी फोरमची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com