भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ऍग्रो व्हिजन

नागपूर :- भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ऍग्रो व्हिजन (अन्न, चारा आणि इंधन) 2022 मध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर, यांनी अटल भूजल योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरिता सहभाग घेण्यात आला सदर प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग भारत सरकार नितीन गडकरी यांच्या हस्ते दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश, शिवराजसिंग चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, भारतीय जनता पार्टी‌चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

सदर प्रदर्शनामध्ये अटल भूजल योजनेचे प्रमुख उद्दिष्टे कार्यपद्धती जलसुरक्षा आराखडा तयार करणे, जल सुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी भूजलाचे व्यवस्थापनासाठी दरवर्षी करायचे कामे, भूजल व्यवस्थापनासाठी गावांमध्ये कोणकोणत्या उपाय योजना राबवता येतील तसेच त्रयस्थ मूल्यमापन याबाबत प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात आली.

सदर प्रदर्शनामध्ये पाणी बचतीच्या विविध उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जलसंवर्धनासाठी पाणलोट क्षेत्राचे दर्शनीय नमुने, चित्ररथ, छतावरील पाऊस पाणी संकलनाची प्रत्यक्ष नमुने प्रदर्शनी मध्ये प्रदर्शित करण्यात आले.

यावेळी आमदार विजय जाधव, बुलढाणा, उपसंचालक डॉ. शिवाजी पदमणे, मंगेश चौधरी, डॉ. वर्षा माने, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर, राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर, तंत्र अधिकारी, नंदकिशोर काळबांडे, मिलिंद भगत, दिलीप परसोडकर, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ, बाबा भसारकर, माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी तज्ञ, निलेश खंडारे, दर्शन दुरबूळे, प्रतीक हेडाऊ, गौतम मेश्राम, मयूर दुहीजोड,शुभांगी रोकडे, तृप्ती कडवे, दीपक थोटे, कृष्णा चौरागडे, सतीश बागडे तसेच शेतकरी वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये लोकांनी अटल भूजल योजनेच्या प्रदर्शन स्थळी भेट दिली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर जिल्हा परिषदेत संविधान दिवस उत्साहात साजरा

Mon Nov 28 , 2022
नागपूर :- नागपूर जिल्हा परिषदेत संविधान दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारती समोरील प्रांगणात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता विष्णू कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविका वाचन करण्याचा उपक्रम नागपूर जिल्हा परिषदेमधूनच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com