मुंबई :- जपानमधील चिबा येथे (जुलै 2-13, 2023) या काळात आयोजित 64 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (आयएमओ ) 2023 मध्ये सहा सदस्यीय भारतीय चमूने 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळवत 112 देशांमध्ये 9वे स्थान पटकावले.
या स्पर्धेत भारताने चौथ्यांदा अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले आहे (भारताने 1998 आणि 2001 मध्ये 7 वे आणि 2002 मध्ये 9वे स्थान मिळवले होते). 1998 (3 सुवर्ण), 2001 (2 सुवर्ण) आणि 2012 (2 सुवर्ण) नंतर भारताने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये किमान 2 सुवर्ण पदके मिळवण्याची कामगिरी चौथ्यांदा केली आहे, गणित ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. पृथ्वीजीत डे यांनी ही माहिती दिली.
सुवर्ण पदक विजेते आहेत :
1. अतुल शतावर्त नदीग (बंगळुरू, कर्नाटक) — 42 पैकी 37 गुण
2. अर्जुन गुप्ता (नवी दिल्ली ) — 42 पैकी 37 गुण
रौप्य पदक विजेते आहेत:
1.आनंदा भादुरी (गुवाहाटी , आसाम ) — 42 पैकी 29 गुण
2. सिद्धार्थ चोप्रा (पुणे , महाराष्ट्र ) — 42 पैकी 29 गुण
कांस्य पदक विजेते आहेत:
1. आदित्य मांगुडी व्यंकट गणेश (पुणे , महाराष्ट्र ) — 42 पैकी 22 गुण (कांस्य )
2. अर्चित मानस — (हैदराबाद ) — 42 पैकी 20 गुण (कांस्य )
टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर ) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र हे प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्ससाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित) विद्यार्थ्यांची निवड करण्याचे नोडल केंद्र आहे.होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेतलेल्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेच्या विविध टप्प्यांतून अंतिम चमू निवडला जातो.(अधिक माहितीसाठी https://olympiads.hbcse.tifr.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्या )