सामान्य नागरिकांसाठीही खुले असणार इंडियन सायन्स काँग्रेस,आपल्या पाल्यासह अवश्य भेट देण्याचे आवाहन

नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे विद्यापीठाच्या कोप-याकोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन आहे. ऐकायचे असेल तर नवल, बघायचे असेल तर नवल आणि अनुभवयाचे असेल तर विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिषद खुली आहे.

विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अमरावती रोडवरून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रयोजन आहे. उजव्या बाजुला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदण करता येते. तथापि नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणा-या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण ए ते एफ असे सहा हॅाल असणार आहेत. हॅाल ए मध्ये आयआयटी मद्रास, इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॅाटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॅालमध्ये असणार आहेत.                   हॅाल बी मध्ये केंद्र शासनाच्या विविध संस्थांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. यात झुलॅाजिकल सर्वे ऑफ इंडिया, रजिस्टार जनरल आफ इंडिया, व्हीएनआयटी, ब्युरो आफ इंडियन स्टँडर्ड, इंडियन इन्स्टिट्यूड आफ ॲस्ट्रोफिजिक्स, इंडियन कौन्सिल फार मेडिकल रिसर्च आदी संस्थांचा समावेश असेल.

हॅाल सी, डी आणि ई हे हॅालमध्ये देखील विज्ञान विषयावर आधारित शासकीय तसेच खाजगी संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत माहितीपूर्ण व आकर्षक असा हॅाल हा डीआरडीओ या संरक्षण संस्थेचा असणार आहे. यात डीआरडीओच्या छत्राखाली येणा-या विविध निर्मिती संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण असणा-या या हॅालमध्ये डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी, सॅालिड स्टेट फिजिक्स लेबॅारेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी अशा अनेक माहिती नसलेल्या संस्थांची माहिती देण्यात येणार आहे.     

शस्टॅालच्या बाहेर ऑलिम्पिकच्या धर्तीवर विज्ञानविषयक ज्योत तेवत असणार आहेत. त्याबाजुला स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी असणार आहे. यात इस्त्रोची माहिती देण्यात येणार आहे.

ख-या अर्थाने विविधांगी विज्ञान विषयक विविध संस्था, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे. यासोबतच विविध प्लेनरी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहेत. या विज्ञानविषयक चर्चा करण्यात येणार आहे. या विज्ञान परिषदेला अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावित्रीबाई नसत्या तर आज महिला सर्वोच्य पदावर नसत्या - डॉ. प्रशांत नारनवरे

Wed Jan 4 , 2023
नागपूर : जेथे जननीची पुजा होते ती महानभूमी आहे. जननी ही महान आहे. जन्माला आल्याबरोबर वडीलांचा आश्रय, लग्नानंतर पतीचा आश्रय, म्हातारपणी मुलांचा आश्रय. लग्न झाल्यावर त्या घरुन अर्थीच निघावी असे संस्कार आपल्या मनावर रुजवल्या गेले. स्त्रियांना सर्व अधिकारापासून वंचीत ठेवल्या गेले. सावित्रीबाई फुले यांनी सर्व स्थिती बदलविली व शिक्षणासारखे सर्वात मोठे धन स्त्रियांना दिले. या 100 वर्षात महिलांनी दाखवून दिले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!