नागपूर :- केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या सन २०२३-२४ या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता एकूण १५ जागांसाठी महाराष्ट्रातून प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांच्या मार्फत २० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
ओडिशा राज्यातील बरगढ येथे स्थित भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदवीका अभ्यासक्रमाकरिता राज्यातून १३ जागा तर आर्थिक् दुर्बल घटकासाठी १ जागा तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पस करिता २ जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकडून प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग , नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग, नागपूरचे आयुक्त एम.जे.प्रदिप चंदन यांनी कळविलेले आहे.
विदर्भातील ११ जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रं.२, ८ वा माळा, बि विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांचेकडून प्राप्त करुन घ्यावा. कार्यालयाच्या 0712-2537927 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे.
@ फाईल फोटो