भारतीय व्यवस्थापन संस्था –आयआयएम- नागपूरचा दीक्षांत सोहळा 24 एप्रिल रोजी

राष्ट्रपतीच्या हस्ते होणार  आयआयएम नागपूर कॅम्पसचे 8 मे ला उद्घाटन

नागपूर  21 एप्रिल  2022 – नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्र परिसरातील  भारतीय व्यवस्थापन संस्था –आयआयएम- नागपूरचा  दीक्षांत सोहळा 24 एप्रिल 2022  रोजी सकाळी  10.45 वाजता होणार असून  आयआयएम नागपूरच्या नव्या परिसराचे उद्घाटन    हे 8  मे 2022 ला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे,  अशी माहिती  आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.  भिमराया मैत्री यांनी आज नागपूर मध्ये दिली याप्रसंगी दृश्य प्रणालीद्वारे  आयआयएम नागपूरचे अ‍ध्यक्ष   सी. पी. गुरुनानी उपस्थित होते.

नागपूरमध्ये राष्ट्रपतींचा पूर्व नियोजित दौरा 23 एप्रिल रोजी  होता परंतु काही अपरिहार्य कारणास्तव  हा दौरा पुढे ढकलण्यात आल्या असून  आयआयएम नागपूरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती 8 मे रोजी येणार असल्याची माहिती सी.पी. गुरनानी यांनी दिली.

       2015 पासून आयआयएम  ही संस्था नागपूरात कार्यरत असून करोना साथीमुळे गेली दोन वर्ष दीक्षांत सोहळा होऊ शकला नाही . त्यामुळे   24 एप्रिल रोजी आयोजित आयआयएमच्या  चौथ्या पाचव्या आणि सहाव्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रसंगी एकूण 424 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून याप्रसंगी लार्सन अँड टर्बो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यम उपस्थित राहणार आहेत .

       आयआयएम नागपूर बद्दल माहिती देताना संचालक डॉ.  भीमराया मैत्री यांनी सांगितले की , 132 एकर परिसरावर पसरलेले  आयआयएमचे कॅम्पस हे  शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार  ईपीसी-  इंजीनियरिंग प्रोक्योरमेंट आणि  कन्स्ट्रक्शन करणारी पहिली संस्था आहे.  या संस्थेचा एक कॅम्पस पुणे येथे सुद्धा सॅटलाईट कॅम्पस म्हणून विकसित करण्यात आला आहे . या संस्थेद्वारे सध्या एमबीए, पीएचडी, पीएचडी एक्झिक्युटिव या सारखे  अभ्यासक्रम उपलब्ध असून  वर्किंग  प्रोफेशनल अर्थात काम करणाऱ्यासाठी सुद्धा नागपूर आणि पुणे येथे विकेंड एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राम्स  उपलब्ध आहेत . लघू अवधीचे अभ्यासक्रम    सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील  उपक्रम  ऑईल इंडिया , एचपी कंपनी,  डब्ल्यूसीएल यासारख्या संस्थांसाठी  चालवले जातात. आयआयएम  तर्फे डिजिटल मार्केटिंग प्रोग्राम त्यासोबतच सायबर सिक्युरिटी आणि डाटा सायन्स सारख्या विषयांमध्ये एका वर्षाचा ऑनलाईन  पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम  उपलब्ध आहे.

नागपूरच्या पहिल्या  चरणामध्ये सुमारे 60 हजार स्क्वेअर मीटर बांधकाम झाले असून फेज -2  मध्ये 55 हजार स्क्वेअर मीटरवर  बांधकाम होणार आहे . सध्या फेज वन मध्ये 668 विद्यार्थी क्षमता असून  आयआयएममध्ये  असणाऱ्या सुविधांमध्ये  प्रशासकीय   ब्लॉक, ऍकॅडमीक ब्लॉक, कन्व्हेंशन सेंटर, सुसज्ज ग्रंथालय, आभासी अभ्यासवर्ग, वसतिगृह भोजनालय, क्रीडा संकुल, खुले  सभागृह,  स्वास्थ केंद्र तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था अशा मूलभूत सुविधा  उपलब्ध झाल्या आहेत.   यासोबतच या सर्व बांधकामाला ‘ग्रीन रेंटिंग   फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट फोर लार्ज डेव्हलपमेंट – ग्रिहा एलडी’   ही श्रेणी सुद्धा  प्राप्त झाली आहे. आयआयएममध्ये 20 हायटेक क्लासरूम असून 24 प्रशिक्षण आणि सेमिनार कक्ष आहेत. आयआयएमने 7  सेंटर ऑफ एक्सलन्स सोबत सामंकजस्य करारसुद्धा केले  असून याद्वारे  ज्ञानाचे  हस्तांतरण विविध स्तरावर होत आहे. यामध्ये प्रामुख्याने इंडो जपान रिसर्च सेंटर समावेश आहे , अशी माहितीही  संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी यावेळी दिली.

आयआयएम नागपूर मध्ये प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात जाणारी कॉमन ॲडमिशन टेस्ट अर्थात कॅट ही परीक्षा  उत्तीर्ण  करावी लागते. यासोबतच  या संस्थेतून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  100 टक्के  रोजगार / प्लेसमेंट मिळण्याचा आयआयएम नागपूरचा प्रयत्न असतो. 2022 या वर्षीच्या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंट प्लेसमेंट  आयआयएम नागपूरने दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र दिनी राज्यभरात होणार सामाजिक न्यायाचा जागर ; मंत्री धनंजय मुंडे यांची अभिनव संकल्पना

Fri Apr 22 , 2022
1 मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात, झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहितीपत्रिका पोचणार  लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती           मुंबई  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सबंध महाराष्ट्रात येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अमलात आणली असून यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.             या शासन निर्णयानुसार दि. 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com