संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध प्रलंबीत मागण्यासाठी कामठी तहसील कार्यालयाच्या महसूल कर्मचाऱ्यांनी मागील दहा दिवसापासून पुकारलेला संप अजूनही कायमच आहे.
तेव्हा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावरील प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी,महसूल विभागाचा आकृतिबंध तात्काळ लागू करावा, नायब तहसीलदार संवर्ग 4 हजार 800 रुपये करावा,महसूल सहाय्यक या संवर्गाचा ग्रेड पे 1900 रुपया वरून 2400 रुपये करणे ,अव्वल कारकुन संवर्गाचे पदनाम बदलवून सहाय्यक महसूल अधिकारी करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात यावी, कोतवाल पदाना चतुर्थश्रेणी ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदाचा पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा आदी मागण्यासाठी कामठी तहसील कार्यालयातील महसूल विभागाने 15 जुलै पासून आंदोलन करीत आहेत.