आदिम हलबांचे गोळीबार चौकात बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरु

नागपूर :- महाराष्ट्र सरकारने ४५ जमाती पैकी क्षेत्रबंधना बाहेरील हलबा,माना ,गोवारी ,धनगर,धोबा,कोळी,मानेवारलू व ठाकूर जमातीसह ३३ आदिम जमातींना संविधानिक न्यायापासून वंचित करून ठेवले आहे. आदिम हलबा,हलबी जमातीच्या पुर्वजांच्या व्यवसायामुळे झालेल्या कोष्टीकरणाने हलबा जमातीस घटनात्मक आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. या अन्यायाविरुद्ध नागपुरात ठिकठिकाणी नारे-निर्दशने केले तरी महायुती सरकारने न्याय दिला नाही. हलबांवर कोष्टी व्यवसायावरून आजही अन्याय सुरू आहे,असा आरोप आदिमने केला. आदिम हलबा जमातीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात व शासनाच्या विरोधात आपली भूमिका कठोर करीत राष्ट्रीय आदिम कृती समितीने आक्रोश दाखविण्यासाठी गोळीबार चौक येथे दि. ३०नोव्हेंबर २०२३ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाने सुरुवात झाली.

गोळीबार चौकातील उपोषण मंडपात राष्ट्रीय आदिम कृती समितीचे संयोजक आमदार विकास कुंभारे, जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई, आदिम नेत्या ॲड. नंदा पराते , अभय धकाते, धनंजय धापोडकर, प्रकाश निमजे, धनराज पखाले, मनोहर घोराडकर, भास्कर चिचघरे, रघुनंदन पराते, भास्कर केदारे, हरी चिचघरे, सुरेश देवीकर, शकुंतला वट्टीघरे ,माया धार्मिक,संगीता सोनक, दे. बा. नांदकर,कृष्णा पौनीकर,विजय भगतकर ,केशव हरिदास,बाबुराव हेडाऊ,प्रकाश कुंटे,नरहरी बोकडे,हिरामण खापेकर,नरेंद्र हेडाऊ,विजय भिसीकर यांनी सहभाग घेतला. गोळीबार चौकातील उपोषण मंडपात सायंकाळी माजी नगरसेवक रमेश पुणेकर व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव वाकोडीकर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.

शेकडो वर्षांपासून गोंडवाना प्रदेशात गोंड राजाच्या राज्यात आदिवासींची मूळ वस्ती आहे. नागपूर हे शहर गोंड राजाने बसविल्यापासून आदिम हलबांची वस्ती आहे. इंग्रजांनी मध्य प्रांत व वऱ्हाड ची निर्मिती केली, त्यानंतर हा भाग विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये येतो. या भागातील आदिम हलबा आदिवासी हे मूळचे आहेत. इंग्रजांनी या सी .पी.अँड बेरार भागातील हलबा या आदिवासींचे अभ्यास केले. विदर्भात स्वातंत्रपूर्व काळात लाखोंच्या संख्येने हलबा जमातीची लोकसंख्या असून हलबा जमातीने कोष्टी हा व्यवसाय केल्याने हलबी या नावाने ओळखले गेले .सी .पी.अँड बेरार भागातील सन १८२७ पासूनचे ऐतिहासिक पुरावे, सन १८८१ पासूनचे जनगणना अहवाल, समाजशात्रज्ञाचा अभ्यास, शासन अधिसूचना , इंग्रजांनी हलबा जमातीचा केलेला मानववंश अभ्यास, इंग्रज काळातील जन्म-मृत्यू कायदा,नोंदणी कायदा नुसार हलबा जमातीच्या पूर्वजांनी विदर्भात कोष्टी व्यवसाय केला. प्राचीनकाळात हलबा हेच कोष्टी व्यवसायात आल्याने हलबी म्हणून गणना झाली.मध्य प्रांत व बेरार भागांत जुन्या अभिलेखात हलबा जमातीचा व्यवसायाचा उल्लेख आहे.सन १८८१ व सन १८९१ मध्ये विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने हलबा,हलबी जमातीची लोकसंख्या होती, नागपुरात १३५ वर्षापूर्वी ४० हजार हलबा,हलबी जमातीची लोकसंख्या होती, तीच लोकसंख्या ५-६ लाख नागपूर जिल्हात असायला पाहिजे. असा दावा आदिमचा आहे.

हलबा आदिवासींची हिंदूंपेक्षा वेगळी संस्कृती, रीतिरिवाज ,परंपरा, देवदैवत आहेत परंतु आज त्याचे पूर्णपणे हिंदूकरण झाले. प्राचीनकाळी हलबांनी पोटा-पाण्यासाठी कोष्टी हा व्यवसाय स्वीकारून हिंदू धर्मात येण्याचे पाप केले . या हिंदू धर्माच्या नावाखाली हलबांवर अन्याय होत आहे. या देशाचे संविधान सांगते कि धर्माच्या नावावर भेदभाव करता येणार नाही पण हलबांबाबत अशी घटना नेहमीच घडत आहे. हलबा आदिम जमातीचा आरक्षणाचा संरक्षणासाठी एकजुटीने लढा देत आहोत. विदर्भातील हलबांना कोष्टी, हलबा-कोष्टी करण्याचे षडयंत्र हे संविधान विरोधी आहे. आता सरकारने हलबांचा अंत पाहू नये अन्यथा परिणाम वाईट होतील असा आदिमने इशारा दिला.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान ओमप्रकाश पाठराबे, नागोराव पराते, महेश बारापात्रे, कृष्णा गोटाफोडे, विठ्ठल बाकरे ,रवी पराते ,विजय हत्तीमारे,अरविंद गडीकर ,अश्विन अंजीकर, ,ॲड.राकेश पाठराबे, हरेश निमजे, राजू ताबूतवाले ,ॲड.जितेंद्र वेळेकर, कैलास निनावे, प्रदीप पौनीकर,मोरेश्वर पराते, दिलीप भानुसे,कृष्णा पाठराबे,रमेश वरुडकर,राजू आमनेरकर,अनिल नंदनवार,शेखर सेलूकर,नरेंद्र मौदेकर ,गोपाल पौनीकर ,प्रवीण हवेलीकर ,ज्ञानेश्वर दाढे,रमेश साहारकर, अरुण नंदनवार, कैलास निनावे,गणेश कोहाड, श्रीकांत धकाते ,दिलीप पौनीकर ,प्रकाश दुल्हेवाले ,दिपक उमरेडकर,सुभाष भानारकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत साहित्याचे ‘डिजीटल प्रेझेंटेशन’ आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Dec 2 , 2023
– डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ ग्रंथाचे प्रकाशन नागपूर :- संत साहित्याने समाजावर संस्कार केले आहेत. जुन्या पिढ्यांना या साहित्यातून जीवनाचा खरा मार्ग सापडला आहे. हे संत साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी वर्तमान पिढीवर आहे आणि आज नवीन पिढीचे माध्यम पूर्णपणे बदलले आहे. अशात संत साहित्याचे ‘डिजीटल प्रेझेंटेशन’ झाले तर ते अधिक सोयीचे ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com