नागपूर :- कल्पनेच्या महासागरातून मानवनिर्मित कल्पना करून दीन दलितांच्या भावना आपल्या लेखनातून अधोरेखित करणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिक कवी कल्पना टेंभूर्णीकर यांच्या कविता संग्रह शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात याव्या. याकरिता आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा शासन दरबारी मागणी रेटून धरणार आहे. असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी केले. ते त्यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक विमोचनाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता बोलत होते. परिवर्तन विचार मंचच्या वतीने त्यांच्या कविता संग्रह पुस्तकांचे विमोचन करून कल्पनाच्या कल्पनेची दखल घेतल्याने या मंचचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले, येत्या 5 डिसेंबर रोजी, मुंबई येथील रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मारकाच्या सभागृहात त्यांच्या जंगी सत्कार करण्यात येणार आहे. जेणेकरून या कविता संग्रह संपूर्ण देशात पोहोचले पाहिजे. असे बागडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुप्रसिद्ध साहित्यिक कवी कल्पना टेंभूर्णीकर यांच्या कविता संग्रह शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा – बागडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com