आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते सत्रांजीपुरा झोनच्या “विकसित भारत संकल्प यात्रेचे” उद्घाटन

नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत गुरुवार (ता ८) रोजी सत्रांजीपुरा झोन येथील विनकर कॉलोनी मैदान येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे सहायक आयुक्त घनशाम पंधरे, सहायक आयुक्त गणेश राठोड, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, माजी नगरसेवक संजय चावरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक संबधित झोन मध्ये उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना विकसित भारतासाठीची शपथ घेतली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवार (ता.८) सतरंजीपुरा झोन येथील विनकर कॉलोनी मैदान आणि तुकडोजी सभागृह, व लकडगंज झोन येथील सुर्यानगर मैदान, प्रभाग क्र. २४ आणि भवानी मंदिर पारडी, प्रभाग क्र. २५ येथे विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी उपस्थितांना विकसित भारतासाठीची शपथ घेत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत शुक्रवार (०९) रोजी आशीनगर झोन येथील आशीनगर झोन कार्यालय आणि ललित कला भवन येथे व मंगळवारी झोन येथील झेंडा चौक, झिंगाबाई टाकळी, प्रभाग क्र. ११ आणि गिट्टीखदान मनपा समाज भवन, चुबे कटारिया भंडार, प्रभाग क्र. १० येथे आयोजित केल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फ़सव्या संदेशाला बळी पडू नका; अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे

Fri Feb 9 , 2024
नागपूर :- अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फ़सव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची विस्तृत माहिती दिली आहे. तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री 9.17 वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com