ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्युत एक्स्पोचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विद्युत एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन झाले. द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अनिल मानापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

असोसिएशनला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ना.गडकरी यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. गडकरी म्हणाले, ‘नागपुरात विद्युत कंत्राटदारांची संख्या वाढली आहे आणि त्यांनी नागपूरच्या औद्योगिक विकासातही योगदान दिले आहे. आता नागपुरात विद्युत उपकरणांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.’ सोलर दिव्यांचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. शहरातील रस्त्यांपासून राष्ट्रीय महामार्गांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होत आहे. त्यानुसार विद्युत कंत्राटदारही नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत, असेही ना.गडकरी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राणी दुर्गावती यांना अभिवादन

Sat Oct 7 , 2023
नागपूर :- वीरांगना रानी दुर्गावती मड़ावी यांच्या 499 व्या जयंती निमित्त आदिवासी कृति समिति व हिरकानी आदिवासी महिला मंडळ तर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी केक कापून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आदिवासी कृति समिति व हिरकानी आदिवासी महिला मंडळ चे संयोजक सदस्य रोहित इलपाची, मुठवा भूमक संघचे परम्परागत गोंडी पुजारी नितेश आत्राम, त्रिवेश कुमरे, सोनू पेंदौर, मनीष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com