– जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची उपस्थिती
– स्पर्धेत प्रकल्पातील १ हजार ९०० विद्यार्थ्यांचा सहभाग
यवतमाळ :- आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिचघाट येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, प्रकल्प अधिकारी तथा स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शन सुहास गाडे, चिचघाटच्या सरपंच आशा राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोहर उके, गोदाजी सोनार व कुमारी आठवले तसेच प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी उपस्थित होते.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या प्रकल्प स्तरीय या क्रीडा स्पर्धा दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धेत प्रकल्पातील 1 हजार 900 खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहे. क्रीडा स्पर्धा आयोजन व नियंत्रणासाठी नेमलेल्या विविध क्रीडा समित्यांमधील चिचघाट शिबला, बोथ, जांब, बोटोनी, अंतरगाव, हिवरी या सात केंद्रांमधील सुमारे 500 कर्मचारी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलिबॉल, कबड्डी खो-खो, भालाफेक, गोळा फेक, इत्यादी क्रीडा प्रकारांचा वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिचघाटच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघमारे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा किनी जवादेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा वानखेडे तसेच एस.जी.गोळे, व्ही.डी.चव्हाण, ए.बी.मोरे, एन.पी.बोरकर, पी.पी.हिंगलासपुरे, कपिल सोनटक्के, डंभारे, चिंचोळकर, किनकर, पी.आर. वानखेडे, वसंत सरागे इत्यादी मुख्याध्यापक व समिती प्रमुखांचे सहकार्य लाभले.