राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या पूजेनंतर मंगळवारी (दि. ४) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला.           आरतीनंतर राज्यपालांनी परिसरातील महालक्ष्मी, दुर्गा, महादेव व हनुमान यांच्या मूर्तींना हार घातला व आपल्या वतीने प्रसाद अर्पण केला. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन नागपूर विमानतळावर स्वागत

Tue Jul 4 , 2023
नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर मंगळवारी दुपारी आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत. विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विशाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com