नागपूर :- भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार करण्यासाठी जनतेमधून सूचना मागविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘माझ्या सूचना, माझा जाहिरनामा’ , ‘नागरिकांच्या सूचना , भाजप चा जाहीरनामा’ अभियानाचा गुरूवारी (ता.२१) भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने शुभारंभ करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी नागपूर प्रदेश कार्यालयामध्ये गुरूवारी (ता.२१) जाहिरनामा समितीची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभियानाची सुरूवात करण्यात आली. जाहिरनामा समितीच्या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, समितीचे मुख्य संयोजक माजी आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, सी.ए. मिलींद कानडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रदेश कार्यालय सह मंत्री संजय फांजे, गिरीधारी मंत्री, डॉ. गिरीश चरडे, तेजिंदरसिंग रेणू, आशिष मुकीम, किर्तीदा अजमेरा, चेतना टांक, दिपेन अग्रवाल, अश्वीन मेहाडिया, विनय जैन, सुरेश राठी आदी उपस्थित होते.
नागपूर लोकसभा मतदार संघासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांमधून सूचना मागवून त्याआधारे भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार केला जाणार आहे. यासंदर्भात भाजपा नागपूरतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसात देत विविध क्षेत्रातील मान्यवर नागपूरसह देशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक महत्वाच्या सूचना मांडत आहेत.
गुरूवारी सुरू झालेल्या अभियानामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजक, सी.ए. तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना बॉक्समध्ये टाकल्या. नागपूर लोकसभा मतदार संघ तसेच देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये भर घालू शकणा-या महत्वाच्या सूचना नागरिकांनी भाजपा कार्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन, भाजपा नागपूर शहर तर्फे करण्यात येत आहे.