संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण व्हायला पाहिजे हीच भाजप पक्षाची संस्कृती आहे. या भारत देशाला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 नंतर केलेल्या जैविक इंधन करारातून भारतीयांना विविध जीवनावश्यक वस्तू ह्या स्वस्त दरात उपलब्ध होतील ज्यामुळे महागाई दर कमी होऊन नागरिकांचा आर्थिक विकास होईल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या पुढाकारातून ‘प्रयत्न जनसंपर्क कार्यालया’चे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी नेत्र तपासणी केलेल्यांना निःशुल्क चष्मे वाटप केले तसेच सरल ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांसोबत काढलेल्या फोटो अल्बमचे विमोचन केले. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रम कौतुक करीत ते फायदेशीर ठरत असून यात निरंतरता ठेवावी, असे आवाहन केले.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अनिल निधान, अजय अग्रवाल ,भाजप कामठी शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,मुस्लिमभाई जाफरी,माजी नगरसेवक लालसिंग यादव, लाला खंडेलवाल यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
27 सप्टेंबर ला माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या गुहक्षेत्रातील हमालपुरा येथे ‘प्रयत्न’जनसंपर्ककार्यालयाचा शुभारंभ करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड चे मोफत वितरण सह विविध नागरी समस्या सोडविण्यात येतील.दरम्यान अग्निविर मध्ये नोकरिप्राप्त तरुण, नृत्य कलावंत, आरोग्य विभागातील आशा वर्कर, अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आमदार चंद्रशेखर बावनकुळेच्या हस्ते स्वागत करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे, उज्वल रायबोले, विजेंद्र कोंडुलवार ,शंकर सोनटक्के,लालू यादव,अजीज हैदरी यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक कपिल गायधने यांनी केले असून आभार प्रदर्शन भाजप पदाधिकारी पंकज वर्मा यांनी मानले.