संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांच्या संकल्पनेतून आणि श्री गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर द्वारा संचालित संघर्ष जगण्याच्या प्रशिक्षण २०२३ अंतर्गत महिला सक्षमीकारणासाठी समाज भवन, ग्रामपंचायत जवळ रनाळा येथे निशुल्क शिवण क्लास प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित रश्मी बर्वे माजी अध्यक्ष जि.प. नागपूर, प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर, पंकज साबळे सरपंच रनाळा, ग्रा.पं. सदस्य सुनील चलपे, अर्चना ठाकरे, मातृतुल्य महीला स्वयं सहायता समूह रनाळा च्या महीला व प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व महिला उपस्थित होत्या.