नागपूर :- आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे यांच्या श्री धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म अँड वेलनेस सेंटर द्वितीय शाखेचा संघ बिल्डिंग महाल येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शुभहस्ते उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या क्लिनिक मधे नागरिकांसाठी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा,रुग्णांसाठी आधुनिक आक्युप्रेशर, मसाज, विरेचन, बस्ती, स्टीम, बालकांसाठी सुवर्णप्राशन, योगा, निसर्गोपचार आणि गर्भवती महिलांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे.
यानिमित्त नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले स्व भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे ३०० हून अधिक रुग्णांनी नेत्र ,दंत, कर्ण , रक्त तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये गरजूना चष्मा आणि कर्णयंत्र निःशुल्क देण्यात आले.या शिबिरात डॉ प्रांजल मोरघडे, डॉ प्रणव थोटे, डॉ कोमल काशीकर, यांनी वैद्यकीय मार्गदर्शन केले. डॉ याप्रसंगी आमदार प्रवीण दटके,आ. विकास कुंभारे, मध्य मंडळ अध्यक्ष श्रीकांत आगलावे, डॉ राजेश मूरकुटे, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल चे प्रशासक डॉ विंकी रुघवानी, प्रदेश महामंत्री डॉ प्रीती मानमोडे, डॉ सुभाष राऊत, कविता इंगळे, श्रद्धा पाठक, रेखा निमजे,सुबोध मुडे, राजेंद्र सोनकूसरे, आणि भाजप मध्य मंडळाचे पदाधिकारी,डॉक्टर्स मित्र परिवार, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.