विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा १ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ अंतर्गत आमदार कृष्णा खोपडे यांच्या आमदार निधीतून दर्शन कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण शनिवार (१ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाला आनंद मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून व आमदार कृष्णा खोपडे यांच्या आमदार निधीतुन विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. विरंगुळा केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार ना. गो. गाणार, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, मनपाचे मुख्य अभियंता लीना उपाध्याय, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, नेहरूनगर झोनचे सहा. आयुक्त अशोक पाटील प्रामुख्याने उपस्थित असतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गांधी जयंती : मुंबई ते देहरादून पर्यावरण सायकल यात्रेला राज्यपाल दाखवणार हिरवी झेंडी   

Sat Oct 1 , 2022
मुंबई :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीच्या दिवशी आर्थिक राजधानी मुंबई ते पर्यावरण राजधानी उत्तराखंड या ८ दिवसांच्या सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवन मुंबई येथून हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत. आर्थिक विकासासोबत निसर्गाचा समतोल राखला जावा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऐवजी सकल पर्यावरण उत्पादन (GEP) हा विकासाचा आधार मानला जावा, या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com