या निवडणूकीत जनताच भाजपा विरोधात मैदानात – विकास ठाकरे

– उत्तर नागपुरातील जन आशीर्वाद यात्रेने मोडले सर्व विक्रम: नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नागपूर :- नागपूर लोकसभा निवडणूकीकडे नागपूरकरच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. महागाई, बेरोजगारी आणि मुलभूत सुविधांचा मुद्दा प्रत्येकाला भेडसावत आहे. त्यामुळे जनता आता भाजपा विरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. याचीच प्रचिति उत्तर नागपुरातील जन आशीर्वाद यात्रेतून दिसून आली. सकाळी आठ वाजता सुरु झालेली यात्रा ही चक्क दुपारी साडेतीनपर्यंत चालली असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले. मध्य नागपुरातील मनपा लाल स्कूल, भुलेश्वर नगर येथे आयोजित सभेत ते बोलते होते.

मंगळवारी सकाळी उत्तर नागपुरातील क्लार्क टाऊन येथून जन आशीर्वाद यात्रेला झाली. नझुल लेआऊट-अंगुलीमान बुद्ध विहार – आंबेडकर नगर-लाल शाळा-इंदोरा मोठा बुद्ध विहार-जुनी ठवरे कॉलनी- आवळेनगर-कामगार नगर चौक-कपिल नगर-बाबादिपसिंग नगर -समतानगर-आर्यनगर-जागृतीनगर-इंदियानगर-मार्टिंन कॉलनी-कस्तुरबा नगर-जरीपटका बाजार मेनरोड मार्गे जिंजर मॉल पोहोचेपर्यंत हाजोरांच्या संख्येत नागरिक स्वयंफूर्तीने सहभागी झाले. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, वेदप्रकाश आर्य, महेंद्र भांगे, दिनेश अंडरसहारे, संदीप सहारे, मनोज सांगोळे, मनोज बनसोड, सुरेश जग्यासी, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, विवेक निकोसे, रोहित यादव यांची उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात मध्य नागपुरातील भुलेश्वरनगर, पूर्व नागपुरातील जयभीम चौक हिवरीनगर आणि उत्तर नागपुरातील भिम चौक, नारा रोड येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. जाहीर सभेत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार, आमदार अभिजित वंजारी, अतुल लोंढे, विशाल मुत्तमेवार, बंटी शेळके यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*क्रेनवरील “त्या” बॅनरने संचारला उत्साह*

उत्तर नागपुरात सुरु असलेल्या यात्रेत हजारोंच्या संख्येत नागरिक सहभागी झाल्यावर जिंजर मॉल परिसरात विकास ठाकरे यांची यात्रा पोहोचात “हर ओर अंधेरा है, ईमादार नेता ही आने वाले कल का सबेरा है, भावी खासदार विकासभाऊ ठाकरे” या ओळींसह मोठे बॅनर क्रेनवर चाहत्यांनी झळकवताच यात्रेत सहभागींमध्ये उत्साह संचारला. तसेच दिवसभर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गरज पडल्यास निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी नजीकच्या कोणत्याही हॉस्पीटलमध्ये कॅशलेस उपचार - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

Wed Apr 10 , 2024
नागपूर :- रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रियेत जे अधिकारी, कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी जर कुणाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला तर अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आवश्यकतेप्रमाणे नजीकच्या खाजगी अथवा इतर कोणत्याही हॉस्पीटलमध्ये कॅशलेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com