‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. दिलीप बलसेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 23 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 24 मे, बुधवार 25 मे व गुरूवार 26 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            कोणत्याही समाजाच्या किंवा देशाच्या प्रगतीत तो देश, समाज इतिहासाच्या कोणत्या वळणावरून पुढे आला, हे नव्या पिढ्यांना ठाऊक असणे आवश्यक असते, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला नेमके काय आहे याचे सामाजिक, भौगोलिक, शास्त्रीय आणि इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचा दर्शनिका विभाग हेच कुतूहल शमविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.त्या- त्या प्रदेशातील  सामाजिक, आर्थिक व भौगोलिक सर्वेक्षण करून त्या आधारे वस्तुस्थितीची मांडणी करून भविष्यात उपयुक्त ठरणारे असे हे संदर्भसाधन निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य दर्शनिका विभाग करतो. या विभागाचे कार्य, त्याचा सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती डॉ. दिलीप बलसेकर  यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 मे पर्यंत अर्ज आमंत्रित

Mon May 23 , 2022
भंडारा, दि. 23 : सन 2021-22 या कालावधीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांनी 31 मे, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी केले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक, बोनाफाईड सर्टिफिकेट, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com