मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :-  मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९ व्या मजल्यावर एकत्रित आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सामान्यांना एकाच ठिकाणी ही कार्यासने उपलब्ध होणार असल्याने त्यांना विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

नवीन प्रशासन भवन इमारतीमधील सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यातील जागेच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर असलेल्या ऊर्जा विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या रोख शाखेस याच इमारतीतील बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूकडील सामान्य प्रशासन विभागाची जागा देण्यात आली आहे.

१९ व्या मजल्यावरील पूर्व बाजूस असलेल्या प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीस (कृषि व पदुम विभाग) नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या सामान्य प्रशासन विभागाच्या व त्याच्या बाजूला असलेल्या कृषि व पदुम विभागाच्या गोदामाची जागा वाटप करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागास बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजू व नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या जागेच्या बदल्यात १९ व्या मजल्यावर पश्चिम बाजूची ऊर्जा विभागाची व राज्य निवडणूक आयोगाची (रोखशाखा) व प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीची (कृषि व पदुम विभाग) पूर्व बाजूची जागा देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली

Thu Sep 22 , 2022
हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला मुंबई :- ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत आपण गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!