25 मे च्या भारत बंद आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवावा-हेमलताताई पाटील

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधि
कामठी ता प्र 23:- राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी)मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्द्यावर आधारित चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले असून त्याआधारे 25 मे 2022 रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंद ला पाठींबा व सक्रिय सहभाग दर्शविला आहे.या भारत बंद आंदोलनातुन मागण्या करण्यात आलेले मुद्दे हे येथील जनसामान्य ओबीसी, एससी,एसटी, अल्पसंख्याक यांच्या सामाजिक हिताचे असल्याने या आंदोलनात विविध सामाजिक समूह संघटना व नागरिक मोठ्या संख्येने सहभाग होणार आहेत यानुसार कामठी शहरातुन सुद्धा या भारत बंदला पाठींबा देत भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी जनसामान्यांच्या न्यायिक मागण्यासाठी या भारत बंद आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आव्हान बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग(ओबीसी मोर्चा),भारत मुक्ती मोर्चा चे पदाधिकारी हेमलताताई पाटील यांनी केले आहे.
हे भारत बंद आंदोलन पुढील 10 सामाजिक मुद्द्यावर करण्यात येत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार द्वारा इतर मागासवर्ग (ओबीसी)ची जातींनीहाय जनगणना करणे, ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करून बँलेट पेपरवर निवडणुका घेणे,खाजगी क्षेत्रामध्ये एससी, एसटी , ओबीसीना आरक्षण लागू करणे, एमएसपी गॅरंटी कायदा बनवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, , एन आर सी/, सी ए ए,/एन पी आर चा विरोध , जुनी पेन्शन योजना लागू करणे, मध्यप्रदेश ,ओडीसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदार संघ लागू करणे, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमिन यापासून विस्थापित करण्याचा विरोध करणे, जबरदस्ती दबाव आणून करण्यात येत असणाऱ्या कोरोना लसीकरण चा विरोध करणे, लॉकडांऊन काळात कामगारांच्या विरोधात बनविलेल्या श्रमिक कायद्याचा विरोध करणे चा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीत जागतिक परिचारिका दिन साजरा

Mon May 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी, ता.23 : परिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त कामठी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फत शहरातील स्व. राजीव गांधी सभागृहात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कामठी पंचायत समितीचे सदस्य सुमेध रंगारी व गुमथळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com