गोयल टॉकीज चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतुकदारावर लावलेले ई-चालान रद्द करा- इर्शाद शेख

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 2:- स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शहरातील मुख्य चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्याना ई चालान पद्धतीने कारवाही करण्यात येत आहे यानुसार गोयल टॉकीज चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या शेकडो च्या वर दुचाकी चालकांना वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई चालान करण्यात आले आहे.हे चालान एकदाच नाही तर एका व्यक्तीवर पाच ते सहा वेळेवर झाले असून 500 रुपया पासून करण्यात आलेले ई चालान हे 5000 हजार रुपया पर्यंत करण्यात आले आहे.याची कित्येकांना माहिती सुद्धा नाही .पोलीस विभागाने कारवाहीचा धडाकाच सुरू केला आहे.या ई चालान ला बरेच नागरिक बळी पडले आहेत.सदर सीसीटीव्ही कॅमेरे हे लोकवस्तीजवळ बसविण्यात आले असून घराजवळच हेल्मेट घालून फिरणे शक्य होत नाही तसेच बाजारात खरेदी करायला आलेल्या नागरिकांना हेल्मेट सक्ती हे योग्य नाही तेव्हा पोलीस विभागातर्फे नागरिकांना लावण्यात आलेले ई चालान रद्द करण्यात यावे अन्यथा पोलीस विभाग विरोधात कांग्रेस तर्फे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा कांग्रेस चे इर्शाद शेख यांनी पोलीस विभागाला दिलेल्या सामूहिक निवेदनातून केला आहे.
कामठी शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे शहरातील मुख्य आठ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही सर्व्हीलियन्स शी जुडले असून प्रत्येक घटना ही या सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद होत आहे. गोयल टॉकीज चौक हे शहरातील मुख्य चौक असून या चौकात लोकवस्तीसह , बाजारपेठ , व्यापाऱ्यांचा वेढा सह नागरिकांचो रेलचेल सतत सुरू असते .या चौकातून दुचाकीने वाहतूक करणाऱ्या अशा कित्येक वाहतुकदारावर वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतुक दंड ठोठावण्यात आला आहे.या चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले बेशिस्त वाहतूकदार वाहतूक कारवाहिस बळी पडले आहेत .कित्येक वाहतुकदार या वाहतूक दंडापासून अजूनही अनभिज्ञ आहेत.कारण ई चालान होऊनही त्यांच्या मोबाईल वर कुठलाही मेसेज न आल्याने त्यांना कल्पना नाही मात्र ज्या बेशिस्त वाहतुकदारांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद आहे त्यांना ई चालान ची माहिती मिळत आहे.

या चौकाला लागून असलेल्या लोकवस्ती मुळे घराबाहेर पडणाऱ्या वाहतुकदारांनी आता हेल्मेट विना बाहेर पडले आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तर ई चालान ला बळी पडावे लागत असल्याने आता घराबाहेर पडताना हेल्मेट वापरून घराबाहेर पडावे लागणार का?असा प्रश्न येथील राहिवासीयांना पडला असून यासंदर्भात पोलीस विभागातर्फे नागरिकांवर लावण्यात आलेले ई चालान त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी कांग्रेस चे इर्शाद शेख यांनी दिलेल्या सामूहिक निवेदनातून केली आहे.
याप्रसंगी मो राशीद अन्सारी, मो सलमान खान, इरफान अहमद, दिवाकर राव सौदागर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समाजकार्य शिबिरे ही आधुनिक समाजनिर्मितीची कार्यशाळा : डॉ पूरणचंद्र मेश्राम

Mon May 2 , 2022
संदीप कांबळे, कामठी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या रासेयो विशेष समाजकार्य ग्रामीण शिबिराचा समारोप कामठी ता प्र 2:-  भारत  हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच देशाचा खरा विकास आहे.  देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये आधुनिक समाज घडविण्याच्या क्षमता विकसित करण्याचे कार्य समाजकार्य शिबिराद्वारे केले जाते. त्यामुळे समाजकार्य शिबिरे ही ख-या अर्थाने आधुनिक समाजनिर्मितीची जणू कार्यशाळाच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com