मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत

मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात अटीतटीची लढत निर्माण झाली आहे. कारण, चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यामुळे या सहा जागांवर कोणाचं सर्वाधिक वर्चस्व राहतंय यावरच आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून असल्याचंही बोललं जातंय.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नितीश कुमारांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली का?; शरद पवारांचं थेट उत्तर

Tue Jun 4 , 2024
मुंबई :- देशात सर्वात मोठा लोकशाही उत्सव होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. अशात आता देशात कुणाचं सरकार येणार? याची सर्वत्र चर्चा होतेय. अशात इंडिया आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची बातमी आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केला आणि उपपंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची बातमी आली. यावर आता खुद्द शरद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com