हिंगणा प्रतिनिधी
हिंगणा (ता २६): – पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून नराधम जावयाने दगडाने व कुऱ्हाडीने वार करून सासू व सासऱ्याची हत्या केली तर पत्नी व सावत्र मुलीला जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास निलडोह ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अमर नगरात घडली आहे . भगवान बाळकृष्ण रेवारे (वय ६५) सासू पुष्पा भगवान रेवारे( वय ६२),असे मृतकांची नावे आहेत तर आरोपीची पत्नी कल्पना नरमु यादव (४०), तिची पहिल्या पतीची मुलगी मुस्कान मंडलीय (वय १३) या जखमी आहेत जखमींना डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून कल्पना ला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुलीला सामान्य वॉर्डात ठेवण्यात आले आहे. तिला किरकोळ जखमा आहेत.यातील आरोपी नरमु सिता यादवने (वय ४५) त्याच्या लहान मुलगा महेंद्र नरमु यादव (वय ८)ह्याला मात्र कुठलीही इजा पोहचवली नाही. प्राप्त माहितीनुसार आरोपी नरमु यादव पत्नी कल्पना, सावत्र मुलगी मुस्कान संतलाल मंडलीय मुलगा महेंद्र नरमु यादव वय ८ वर्ष तसेच सासरा भगवान बाळकृष्ण रेव्हारे व सासू पुष्पा भगवान रेव्हारे असे मिळून राहतात.
कल्पना चे पहिले पती संतलाल मंडलीय हे मुस्कान एक महिण्याची असतांना घर सोडुन गेले होते. त्यानंतर २०१३ मध्ये कल्पना ने नरमु यादव यांचेशी दुसरे लग्न केले होते. तेव्हा पासुन हे सर्व कल्पना व तिचेवडील भगवान रेंव्हारे यांच्या नावाने असलेल्या या घरीच राहतात. भगवान कडे ४०ते ५० बक-या असुन ते त्यांचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आणि कल्पना व तिची आई घरकाम करतात. आरोपी नरमु यादव हा ड्रायव्हर म्हणुन काम करत असून कुणाचीही मिळेल ती गाडी चालवतो . तो कधीही घरी पैसे वगैरे बरोबर देत नव्हता उलट पत्नीला नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागायचा.४०-५० बक-या घरच्या वरच्या रुममध्ये तर खाली हे कुटुंब राहते. शनिवारी दि २५ चे रात्री ९ च्या दरम्यान आरोपी घरी आला व सर्वजन जेवन करून आपआपल्या खोलीत झोपी गेले. घरचे पहिले खोलीमध्ये आरोपी, कल्पना व महेंद्र हे झोपलेले होते व मधल्या खोलीत आजी आजोबा व मुस्कान झोपलेले होते. अचानक मध्यरात्री १२:३० च्या सुमारास पतिपत्नी मध्ये जोराजोराने भांडण सुरु झाले आरोपी चा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे दुसऱ्या खोलीत झोपलेले आजी आजोबा जागे झाले आणि पहिल्या खोलीत जावुन बघीतले असता आरोपी कल्पना ला लाताबुक्यानी मारहान करून गळा दाबत होता व जोरजोराने शिवीगाळ करीत होता. “माझ्या नावाने सर्व बक-या व घर करा “असे ओरडत होता. तसेच “बाहेरगावी जाण्यासाठी पैसे व मोबाईल दें “असे म्हणत होता. तेव्हा म्हातारी पुष्पा भांडण सोडविण्यास गेली असता तिला लात मारुन ढकलून दिले. नंतर भगवान समजविण्यास उठुन आला त्याला घरातील काठीने मारले व परत घरी बाजुला ठेवलेली कु-हाड भगवानच्या डोक्याचे बाजुला खांदयावर मारली नंतर त्याला ओढत घराबाहेर नेले व तेथे मोठ्या सिमेंटचा दगड डोक्यावर टाकला. त्या नंतर पुष्पाला सुद्धा कु-हाडीने व दगडाने मारहान केली. दोन्ही म्हाताऱ्या दांपत्याला दगडाने मारल्याने ते घरासमोर रस्त्यात रक्तात खाली पडले होते. नंतर कल्पनाला सुद्धा कु-हाडीने खांदयावर, डोक्यावर मारहाण केली व मुस्कान ला सुद्धा काठीने मारहाण केली तसेच कु-हाडीने उजव्या हाताच्या करंगळीवर मारून मला सुद्धा जखमी केले हा थरार अगदी रस्त्यावर सुरु होता दरम्यान घराजवळील काही लोक मदतीला आले परंतु आरोपीने त्यांनाही कुऱ्हाड व दगडाचा धाक दाखवून धमकविल्याने ते लोक पळुन गेले.या सर्व घटनेत आरोपी चा मुलगा हा तिथेच होता त्याला मात्र काही केले नाही. चारही जखमी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे बदलले व घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी यानंतर पोलिसांना माहिती दिली . एमआयडीसी चे ठाणेदार उमेश बेसरकर, सहा पोलीस निरीक्षक विनोद गिरी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.सर्व जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात पाठविण्यात आले तिथे डॉक्टरांनी भगवान व त्याची पत्नी पुष्पा रेव्हारे याना मृत घोषित केले. कल्पना व मुस्कान वर उपचार सुरु आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच डीसीपी लोहित मतानी, डीसीपी (गुन्हे शाखा) गजानन राजमाने, सहा पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे ,पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने यांनी घटनास्थळी भेट दिली. शेजारच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी रात्रीच आरोपीचा शोध सुरू केला व त्याला वानाडोंगरी शिवारातून ताब्यात घेतले. या घटनेत मुस्कान हिने दिलेल्या फिर्यादी वरुन सपोनि विनोद गिरी यांनी आरोपी विरुद्ध कलम 302, 307,504,506 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.