कामठी तालुक्यात ठिकठिकानी ध्वजारोहण उत्साहात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कामठी तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानुसार तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

यानुसार कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी तिरंगी झेंड्याला सलामी दिली.यावेळी माजी आमदार देवराव रडके,पंचायत समिती सभापती दिशा चनकापूरे,माजी नगराध्यक्ष माया चवरे,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, कांग्रेस नेता रतनलाल बरबटे शिवसेना नेता राजन सिंह, नायब तहसीलदार राजाराम बमनोटे,उपेश अंबादे, अमर हांडा ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यासह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी सह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कामठी नगर परिषद कार्यालयात प्रशासक व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगर परिषद कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.नविन कामठी पोलीस स्टेशन येथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी समस्त पोलीस वर्ग उपस्थित होते.

कामठी बस स्टँड चौकात पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात कृष्णा पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी इंदलसिंग यादव,सुभान भाई,हुसेन भाई,राजेश काटरपवार,सलीम भाई,राजेश गजभिये, सलमान अब्बास, सुनील बडोले,नरेश फुलझेले,धीरज गजभिये,रिंकु, विजय जैस्वाल,शकील भाई,गजेश यादव, सज्जाक शेख,राजेश कांबळे,राकेश कनोजिया,यासिन भाई आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज मिशन चांद्रयानसाठी महत्त्वाचा दिवस, चांद्रयान-3 चं होणार विभाजन

Thu Aug 17 , 2023
नवी दिल्ली : आज मिशन चांद्रयान-3 साठी महत्त्वाचा दिवस आहे. काल चांद्रयान 3 ला चंद्राच्या 153*163 KM कक्षेत स्थापित केलं गेलं. चंद्राच्या कक्षेतील चांद्रयान 3 चे सर्व मॅन्यूव्हर पूर्ण झाल्याची इस्रोकडून काल माहिती देण्यात आली. आज प्रॉपल्शन मॉड्युलपासून लँडर मॉड्युल वेगळ होईल. दोन्ही मॉड्युल स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात करतील. मिशन चांद्रयान 3 मधील ही एक अवघड आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com