‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त राहुरी कृषी विद्यापीठ केंद्र कोल्हापूर येथील नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले. जागतिक पातळीवर भरड धान्यांच्या उत्पादनात वाढ करणे, कार्यक्षम प्रक्रिया तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्यांचा वापर वाढविण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. अन्नसुरक्षेचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात तसेच राज्यात यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भरडधान्य म्हणजे काय व याचे किती प्रकार आहेत. या पीक पध्दतीमुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होतो याबाबत डॉ. बन यांनी ‘दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. बन यांची मुलाखत मंगळवार दि. 12, बुधवार दि.13, गुरुवार दि. 14 आणि शुक्रवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. 14 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचा नागपूर दौरा

Tue Dec 12 , 2023
नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे 12 डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार (दि.12) रोजी दुपारी 12.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे मुंबई येथून विमानाने आगमन. दुपारी 12.45 वाजता राजभवनकडे रवाना. दुपारी 1.10 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com