कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती चोरणाऱ्या चोरांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेसचा तहसील कार्यालय वर धड़क मोर्चा
नागपुर/ सावनेर – सावनेर तालुकामध्ये कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती उत्खनन करणाऱ्या लोकांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारेच्या नेतृत्वात युवक कांग्रेसचे कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांना तक्रार देवून वलनी, वाकोडी, खापा ते बड़ेगाव पर्यंत खापा पोलीस स्टेशन चा नाकाखालून होत असलेल्या अवैध रेती उत्खनन विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे व बेधड़क रेतीचे उत्खनन करुण विना रॉयल्टी रेतीचे वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रैक्टर वर मोठी कार्यवाही करण्याची मांगनी केली आहे . तसेच खापा पोलीस स्टेशन जवड चौकात व सावनेर खापा बाइपास रोडवर तहसील विभाग व पोलीस विभागची संयुक्त चौकी लावन्यची मागणी करण्यात आली आहे ,जर प्रशासन यांनी या अवैध रेती चोरांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही केली नाही तर सामान्य लोकांना सोबत घेवून युवक काँग्रेस कार्यकर्ते स्वताह रोडावर उतरून चौकी लावू व अवैध रित्या विना रॉयल्टी चालणाऱ्या ट्रक व ट्रक्टर पकडून पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयला आणून लावू अशी चेतावणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे कडून तहिसल प्रशासनला दिली आहे .
सदर निवेदन देताना मनोज बसवार, प्रमोद लांडगे,शेखर घ्यार, मनोज जामदार, राहुल ढ़ोंगड़े, अजय महाजन, मुकेश इंगोले, अमन मोरे, अमोल मोरे, इमरान शाह,रोशन घ्यार, राकेश सूर्यवंशी, राहुल धाधोडे,मोनु ठाकुर, सचिन मोहोतकर, अशे सेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..