खासदार सुनिल मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रक ने दिली धडक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

भंडारा :- खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही.

खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता दरबाराला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव कडे निघाले होते. वैनगंगा नदीवरील पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती याच वाहतूक कोंडी दरम्यान दोन ट्रक चालकांचे भांडण झाले. खासदारांच्या ताफ्यातील इनोव्हा गाडीच्या मागे असलेल्या ट्रक चालकाला दुसऱ्या ट्रकचालकाने गाडीखाली ओढले. यामुळे गेअर मध्ये असलेला ट्रक खासदारांच्या ताफ्यातील गाडीला घासत गेला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने गाडीत बसलेल्या सहकाऱ्यांना व वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच नागरिकांना त्या अनियंत्रित ट्रक मुळे कोणतीही इजा झाली नाही.

NewsToday24x7

Next Post

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

Mon May 22 , 2023
गडचिरोली :- साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 21.05.2023 चे 00.01 वा. ते दिनांक 04.06.2023 चे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com