– दिनेश दमाहे
नागपूर – बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह, २ मॅगझीन व ६ राउॅन्ड जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्र ५ ने अटक केल्याने खळबळ उडाली आहे त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि,09.03.2022 रोजी आरोपी मोहम्मद आफताब वल्द मोहम्मद असलम वय 22 वर्ष रा. टिपु सुल्तान चौक, मेहबुब पुरा, मशीद मागे, अब्बास अली चे घरी किरायाने, पोस्टे यशोधरानगर, नागपूर शहर याने मा. गृह विभाग महाराष्ट्र शासन त्यांचे अधिसुचनेचे व सह पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे मनाई आदेश कलम 37(1) मुपोकाचे उल्लंघन करून आपले ताब्यात विनापरवाना अवैध रित्या 1) एक लोखंडी धातुची गावठी बनावटीचे पिस्टल किं. 15,000 रू 2) दोन लोखंडी मॅगझीन व 06 राउॅन्ड किं. 8000/-रू असा एकूण 23,000/-रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घते ले. नमुद आरोपीताचे हे कृत्य गुन्हा कलम 3, 25 भा. ह. का. सह कलम 135 मु.पो का.प्रमाणे होत असल्याने गुन्हा दाखल केला आहे .
सदरची कामगिरी नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) सुनिल फुलारी यांचे निर्देशान्वये चिन्मय पंडीत, पोलीस उपायुक्त (डिटेक्षन)गुन्हे शाखा व रोशन पंडीत, सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक मुकुंदा सांळुखे यांचे नेतृत्वात सपोनि संकेत चौधरी, पाउे पनि संतोष इंगळे, पोलीस अमलदार
दिपक कारोकार, दिनेश चाफलेकर, चंदु ठाकरे, अनिल बावणे, आशिष देवरे, पंकज लांडे, जितेन्द्र दुबे, सुनिल वानखेडे,साईनाथ दब्बा, उत्कर्ष राउत व चालक नासीर शेख व विकास चंहादे, गोपाल यादव यांनी पार पाडली.