– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई
कळमेश्वर :-दिनांक १४/१०/२०२३ रोजी पोस्टे कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे तसेच पोलिस स्टेशन कळमेश्वर चे प्रभारी अधिकारी सोळसे, पोलीस निरीक्षक दाबेराव यांचे नेतृत्वाखाली आज दि. १४/१०/२०२२ रोजी पोलिस स्टेशन कळमेश्वर हदीतील गोंडखैरी पारधी बेडा येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकुण किमती ११,७५,८८८ /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण १४ आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कारवाई दरम्यान एकुण ७७४२ लिटर कच्चे रसायन सड़वा ४०० लिटर गावठी तयार दारू व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाईसाठी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील सहायक पोलीस निरीक्षक मेश्राम पोटभरे, पोलीस उपनिरीक्षक टिपले, व २० अंमलदार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे व २२ अंमलदार पोलीस मुख्यालय येथील आर सी. पी पथक, क्यु. आर. टी. पथक, पोलीस स्टेशन सावनेर येथील ०१ अधिकारी ०५ अंमलदार, पोस्टे केळवद येथील ०३ अंमलदार, पोस्टे खापा येथील ०३ अंमलदार असे संयुक्तिकपणे पार पाडली.