अमरावती :- पीडित महिलांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणारी ‘मनोधैर्य योजना’ वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय प्रबोधिनी, अमरावती येथे आयोजीत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण व शहरी असा भेद न करीता सर्वसमावेशक धोरण आखून समुपदेशन झाल्यास व महिलांना मानसिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम केल्यास अशा योजना समाजापर्यंत पोहचविणे शक्य होईल. संत गाडगे फ्रााफ्राा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम त्यासाठी सहाय्यक ठरत आहे. त्यामध्ये एम. ए. समुपदेशन व मानसोपचार, पी.जी. डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, पी. जी. डिप्लोमा इन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रम महिला व विद्यार्थीनींनी पूर्ण केल्यास मनोबल वाढून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. विपला फाउंडेशन, मुबई व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास विभाग, पुणे येथील समन्वयक निलेश शिंदे यांनीही मनोेधैर्य योजनेची विस्तृत माहिती यावेळी दिली. प्रबोधिनीचे प्रा. अनिरुद्ध पाटील यांनी विविध उदाहरणाव्दारे मनोधैर्य योजनेची कार्यप्रणाली, उपयोगिता याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जी. बी. पाटील यांनी मनोधैर्य योजनेमध्ये असलेले विविध कायदे व त्याची अंमलबजावणी या विषयाची माहिती दिली. कार्यशाळेला डॉ. प्रशांत भगत, प्रा. मंजुषा बारबुद्धे, प्रा. शुभांगी रवाळे, प्रा. सुरेश पवार, प्रा. वैभव जिसकार, प्रा. राम ओलीवल, डॉ. बी. बी. चिखले, प्रा. संदीप मोरे, प्रा. एम आर. वहाणे, प्रा. विनय पदलमवार, प्रा. स्वप्निल ईखार, प्रा. आदित्य पुंड, प्रा. अश्विनी राऊत, प्रा. मनिषा लाकडे, प्रा. जुबेर खान, प्रा. अर्चना ढोरे, प्रा. राधिका खडके, प्रा. राहुल दोडके आदींची उपस्थिती होती.