सरकारला आमची प्रेतं पहायची असतील तर अरबी समुद्रात पाहा, हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने, मागण्या काय? 

बुलढाणा :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या  मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात पहा. मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. बुलढाण्यातील हजारो शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अरबी समुद्रात हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत.

रविकांत तुपकर यांनी टीव्ही शी बातचित केली. ते महणाले, ‘ या वर्षी अति पावसाने सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालंय, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. उत्पादन खर्च भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. एका क्विंटलचा भाव 6 हजार रुपये आहे.

बाजारात मिळणारा भाव 5 ते साडेपाच हजार रुपये आहे. हे दर कमी होत आहेत. कापसाचे दर उतरले आहेत. अशा स्थितीत सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. गेले महिनाभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण सरकार दखल घेत नाहीये, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

6 नोव्हेंबरला आम्ही बुलढाण्यात 50 हजार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. आमचं जगणं मान्य करा, अशी हाक सरकारला दिली. सरकारला आमचे प्रेतच पहायची असतील तर ती अरबी समुद्रात पहावीत, आम्ही हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत…

सरकार निगरगठ्ठ झालं आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी 50 टक्के आहे तर कापूस उत्पादक शेतकरी 18 टक्के आहे. 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचं काम सरकार करतंय, असा इशारा तुपकर यांनी दिला…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

योजनेच्या पंखावर विद्यार्थ्यांनी घेतली भरारी - 53 विद्यार्थी बनले अभियंता, डॉक्टर अन् व्यवस्थापक

Wed Nov 23 , 2022
-यूके, यूएसए, जर्मनी, ऑस्ट्रेलियात शिक्षण -प्रति विद्यार्थी 40 ते 50 लाखांचा खर्च नागपूर :- सामान्यांकडे आशा आणि इच्छा असतात तर यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना. स्वप्न तर प्रत्येकाकडे असतातच. पण निव्वळ स्वप्न राहून उपयोग नाही. ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर परिश्रमाचीच नव्हे तर कृतीचीही गरज असते. नागपूर विभागातील अशाच 53 विद्यार्थ्यांनी त्याग आणि कठोर परिश्रमासह सकारात्मक कृती केली. परदेशात जाऊन शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com