रेनवॉटर हार्वेस्टिंग झाले नसल्यास बांधकामधारकांची अनामत रक्कम होणार जप्त

शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य

मोठ्या इमारती (अपार्टमेंट) मध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास मनपातर्फे केले जाणार सन्मानीत  

१५ दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांनी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग न केल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना १००० चौ. फुट पर्यंतच्या इमारती क्षेत्राला ५ हजार , १००१ ते २००० चौ. फुट क्षेत्राला ७ हजार तर २००१ पुढील चौ. फुट क्षेत्राला १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करत सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येते.

शहरात बांधकाम परवानगी प्राप्त इमारतींपैकी १२४ इमारतधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर करून अनामत रक्कम परत घेतली आहे. उर्वरीत बांधकामधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. महानगरपालिका सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे.

रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यासंबंधी सर्व मालमत्ता धारकांना दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सुचित करण्यात येत असुन प्रोत्साहन म्हणुन राष्ट्रवादी नगर येथील हॉटेल जायका फुड अँड ड्रींक्सतर्फे खाद्य पदार्थांवर १० टक्के सुट देणारे कुपन शहरातील रेन वॉटर हार्वेस्टींग करून देणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात आले असुन नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसविल्यावर कंत्राटदारांकडुन सदर कुपन घेता येईल. अधिकाधिक नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हातमाग कापड स्पर्धेतून विणकरांना प्रोत्साहन - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Thu Mar 23 , 2023
बांबू व टसर सिल्क पासून तयार साडीला प्रथम पुरस्कार नागपूर :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत नागपूर येथील विणकर नामदेव लिखार यांच्या टसर सिल्क आणि बांबू यांसारख्या नैसर्गिक तंतूंचा वापर करून तयार केलेल्या नाविण्यपूर्ण साडीला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मोहाडीचे गंगाधर गोखले यांनी विणलेल्या साडीला आणि नागपूरचेच नासिर शेख यांनी विणलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!