हायवे रोड वर उभ्या कोळसा ट्रक ला आयसर वाहनाची धडक, एक मृत्यु, एक जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत हायवे रोडवर टेकाडी पुला जवळ येणाऱ्या आयसर वाहनाला एका एक गाय आडवी आल्याने वाहन उजव्या बाजुला घेतले असता उभा असलेल्या कोळसा ट्रक ला मागुन जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात वाहन चालकाचा मृत्यु तर किलींअर जख्मी झाला.

प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.५) नोव्हेंबर ला रात्री १.३० वाजता दरम्यान आयसर गाडी क्र.एम एच.१९.सीवाय. ६०११ ही कुरीअर पार्सल भरून नागपुर वरून बालाघाट येथे जात असतांना हायवे रोड वर टेकाडी पुलाजवळ अचानक एक गाय रोडवर आल्याने तिच्या बचावाकरिता आयसर वाहन चालका ने आपल्या ताब्यातील वाहन उजव्या साईडला वळवि ले असता समोर विना रिफलेक्टर, विना पार्किंग लाईट , विना इंन्डीकेटर उभा असलेला कोळसा ट्रक क्र.एम एच.४०.बिजी. ६६६१ ला मागुन जोरदार धडक लागल्याने आयसर वाहन चालक कुनाल टेंभुर्ने हा गंभीर जख्मी व कंन्डक्टर प्रेम मेश्राम हा किरकोळ जख्मी झाला. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन दोन्ही जख्मींना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान आयसर गाडी चालक कुनाल टेंभुर्ने चा मृत्यु झाला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रेम मेश्राम यांचा तक्रारी आरोपी ट्रक क्र. एमएच ४०.बिजी.६६६१ चा चालका विरुध्द अप क्र ६९१/२३ कलम २७९ , ३३७ , ३०४(अ) सहकलम १३४/१७७ अ,ब १८७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक पराग फुलझले,पो हवा जयलाल सहारे, शिपाई कोमल खैरे हे करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कबड्डी - महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा दुसऱ्या विजयासह बाद फेरीतील प्रवेश निश्चित

Mon Nov 6 , 2023
– राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघापुढे साखळीतच गारद होण्याची भीती पणजी :-महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने रविवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत साखळीतील सलग दुसऱ्या विजयानिशी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघ मात्र साखळीतच गारद होण्याची शक्यता आहे. पुरुष गटातील अ-गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने तमिळनाडूला ४४-२१ असे पराभूत केले. नैसर्गिक खेळ करीत पहिल्या सत्रात २४-११ अशी आघाडी घेतली होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!