चंद्रपूर – शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी गंजवॉर्ड येथील आय एम ए सभागृहात आयोजित महिला दिन सप्ताह कार्यक्रमात “किचन टू मनपा” यावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महापौरांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली आणि महापौर पदावर असताना चंद्रपूर शहराच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांची माहिती उपस्थित महिलांना दिली. घर सांभाळून राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरताना येणाऱ्या अडचणी आणि महिलांविषयी असलेली आपुलकी यावेळी त्यांनी आपल्या अनुभवातून व्यक्त केली. आपले आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर परिसर स्वच्छता राखावी. शिवाय कोरोना संपला असलातरी हात धुणे, मास्क लावणे या सवयी नियमित पाळणे देखील महत्त्वाचे असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. शलाका मामिडवार, डॉ. पल्लवी अल्लूरवार, डॉ. मनीषा घाटे, डॉ. प्रिया शिंदे, डॉ. सिद्धिका नायडू अभरणा अरविंद, डॉ. किर्ती साने, डॉ. प्रेरणा कोणते, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. पुनम नगराळे, निकिता नागरेच्या, डॉ. कल्पना गुलवाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी वुमन्स विन्स ग्रुप आय एम ए ग्रुप संगिनी ग्रुप अशा विविध ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या.