मला समृद्ध समाजाची निर्मिती करायची आहे – महसुल सप्ताहामध्ये आमदार जयस्वालांचे उद्गार

– तहसिल कार्यालय येथे महसूल सप्ताह सांगता समारोह संपन्न

रामटेक :- महाराष्ट्र राज्याच्या वतीने महसूल सप्ताह चे आयोजन करण्यात आले असुन त्यानुसार स्थानिक तहसील कार्यालयामध्येही या सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान दि. ७ ऑगस्ट ला महसुल सप्ताह चा समारोपीय कार्यक्रम पार पडला. यात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन ‘ एक समृद्ध समाजाची निर्मिती करायची आहे ‘ असे उद्गार काढत उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना संबोधन केले.

१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसुल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह दरम्यान एक ऑगस्टला महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर दोन ऑगस्टला ‘ युवा संवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर तीन ऑगस्टला ‘ एक हात मदतीचा ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर चार ऑगस्टला ‘ जनसंवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर पाच ऑगस्टला ‘ सैनिक हो तुमच्यासाठी ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर सहा ऑगस्टला ‘ महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त कर्मचारी – अधिकारी संवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला. दि. ७ ऑगस्टला या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून एस.डी.ओ. वंदना सवरंगपते ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष जयस्वाल हे उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार आशिष जयस्वाल व इतर मान्यवरांकडुन सत्कार करण्यात आला. नवनियुक्त कोतवालांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार कुलदीवार यांनी केले. कार्यक्रमात तहसिलदार हंसा मोहने, बि.डी.ओ. जयसिंग जाधव, रामटेक चे पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव, पारशिवनीचे पोलीस निरिक्षक सोनवाने, न.प. रामटेक मुख्याधिकारी पल्लवी राऊत, नगर पंचायत पारशिवनी च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, लिपीक बागडे, कोतवाल रोशन ठकरेले यांचेसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कामाची पेन्डेंसी ठेवु नका – आमदार जयस्वाल

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या भाषणात बोलतांना येत्या काही दिवसात घराचे पट्टे व नविन प्लॉट वाटपाचा उपक्रम हाती घ्यायचा असुन त्यासाठी वरच्या पातळीवर माझा सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. तसेच गरजु लाभार्थांना लाभ मिळला पाहीजे तथा कामाची पेन्डेन्सी राहता कामा नये असे शिस्तीचे निर्देश यावेळी उपस्थीत अधिकारी – कर्मचाऱ्यांना आमदार जयस्वाल यांनी दिले. ‘ हर घर दस्तक अभियान ‘ मी सुरु करीत असुन त्याद्वारे एक समृद्ध समाज निर्माण करायचा असल्याचेही जयस्वाल यांनी सांगीतले. कर्मचार्यांनी आपली प्रतीमा अशी निर्माण करावी की त्यांच्या बदलीची तक्रार घेरून कुणीही माझेकडे येऊ नये अशी समज सुद्धा उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आप के नागपुर जिला अध्यक्ष पद पर वृषभ वानखेड़े का चयन

Wed Aug 9 , 2023
– नागरिक अभिनंदन समारोह सम्पन्न काटोल :- आम आदमी पार्टी के नागपुर जिला (ग्रामीण) अध्यक्ष पद पर हाल ही में वृषभ वानखेड़े को अध्यक्ष चुना है। इस अवसर पर आम आदमी पार्टी काटोल शहर कमेटी, काटोल तालुका कमेटी, शुभचिंतकों और नागरिकों की ओर से उनका अभिनंदन किया गया। वरिष्ठ नागरिक विट्ठलराव काकड़े, सुनील वडस्कर, सुधाकर सांबारतोड़े, रमण मनकवड़े, दत्ता धवड़, ईश्वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com