नागपूर :- भारताच्या स्वातंत्र्याकरीता असंख्य देशभक्तांची प्राणार्पंण केले अशा हुतात्मा देशभक्तांचे स्मरण करुन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन मिनिट मौन पाळून हुतात्मा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला तसेच थोर हुतात्म्यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी उपायुक्त विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक संचालक नगर रचना ऋतुराज जाधव, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम आदी उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला देखील मनपाद्वारे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि गांधीसागर बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, माजी नगरसेवक मनोज साबळे राजेश कुंभलकर, डॉ. पांडे यांच्यासह पोलिस आणि अग्निशमक दलाचे जवान यांनी हुतात्मांच्या स्मृतींना अभिवादन केले.