नागपूर :- प्रखर राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ता, कवी, माजी पंतप्रधान,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगर पालिकेच्या वतीने अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
एक संवेदनशील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख होती. अटलजी वक्ता दशसहस्रेशु होते. त्यांची अमोघ.. ओजस्वी वाणी ऐकण्यासाठी समस्त देश आतूर असायचा. प्रत्येक सभेला देशभर लाखोची गर्दी व्हायची. जेव्हा त्यांनी पत्रकारीता केली त्यामध्येही पत्रकारीतेचा आदर्श निर्माण केला. अटलजींना जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानाचा मुजरा.
कार्यक्रमा प्रसंगी जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, वित्त विभागाचे प्रकाश खानझोडे, शैलेश जांभुळकर आणि माजी सैनिकांची उपस्थिती होती.