कन्हान :- नरहरि नगर गहुहिवरा रोड पानतावने कॉलेज जवळ कांद्री येथील सतिश येरपुडे यांच्या घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोराने घरफोडी करून नगदी रोख सह सोन्या, चांदीचे दागिने असे ४८,२५० रू.चा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
रविवार (दि.२) फेब्रुवारी ला नरहरि नगर गहुहिवरा रोड पानतावने कॉलेज जवळ कांद्री येथील रहिवासी सतिश ओंकारेश्वर येरपुडे हे त्यांचे मामा प्रताप आनंदराव डोंगरे रा. पांजरा ता. मोहाडी जि भंडारा यांचे गावी मंडईचा कार्यक्रम असल्यामुळे सह परिवार गेले होते. मंगळवार (दि.४) ला सकाळी ९.३० वाजता त्यांचा स्कुल व्हॉन चालक अखिलेश गेडाम रा. खेडी-खोपडी यांनी फोन केला की, बाहेरच्या गेटला कुलुप लागलेले दिसत असुन मुख्य दरवाजा अर्धवट उघडा आहे असे सांगितल्याने लगेच मामाच्या गावातुन निघुन घरी कन्हान ला पोहचुन पाहिले तर त्यांचे घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने घरफोडी करून घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले तसेच दोन कपाट व दोन दिवान तुटलेले दिसले. त्याती ल नगदी १०,००० रुपये, लहान मुलीचे सोन्याचे काना चे खड़े ३ ग्राम अंदाजे किंमत १०,००० रु, सोन्याची नथ १ नग किंमत १३००० रू, लहान सोन्याचे ३ मनी किंमत २००० रु, कमरेचा चांदीचा आकडा किंमत ८०० रु, चांदीचा ब्रासलेट किंमत १२५० रू, पायातील पायपट्ट्या जोडी किंमत ११,२०० रु असा एकुण ४८,२५० रु चा मुद्देमाल रोख सह कोणीतरी अज्ञात चोराने घराचे मुख्य दरवाज्याचे कडी कोडा तोडुन नगदी रोख व सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची पोलीस स्टेशन कन्हान येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.