– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत घरफोडी करून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक घरफोडीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र लक्षीत करून समांतर तपास सुरु केला. तपासा दरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे सराईत गुन्हेगार शेख अशफाक शेख आसिफ वय ४० वर्ष, रा. मोहम्मदीया कॉलनी, बिड, पो.स्टे. पेठविड ह. मु. भायेगांव ता. अंबड जि. जालना आणि आरोपी शंकर तानाजी जाधव वय ४० वर्ष, रा. गुलाबवाडी, मालधक्का, नाशिक या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपांनी नागपूर ग्रामीण जिल्हयात उमरेड, कुही आणि बुटीबोरी या भागात विवीध ठिकाणी घरफोडी करून सोने चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरी केल्याचे सांगीतले व चोरी केलेले दागीने घनसावंगी जि. जालना येथील डि. एस. ज्वेलर्स येथे विकल्याची माहिती दिली. डि. एस. ज्वेलर्स यांचेकडून खालील नमुद पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेतील चोरी गेलेले एकूण १३९.५ ग्रॅम सोनेवाजार भाव किंमत ५,५२,३०० एक चारचाकी वाहन किंमत ३,००,००० /- रुपये व घरफोडी करण्याकरीता वापरलेले हत्यारे किं. २१० रुपये असा एकुण ८,५२,५१० /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. वरील दोन्ही आरोपीतांकडून नागपूर ग्रामीण जिल्हयातील एकुण ०५ गुन्हे उघड करण्यात आले असून आरोपी शेख अशफाक शेख आसिफ याचेवर राज्यातील विविध जिल्हयात घरफोडीचे ५५ गुन्हे दाखल असून अश्याच गुन्हयांत तो पोलीसांना पाहीजे असलेला आरोपी आहे. त्याने हैद्राबाद येथे सुध्दा बरेच ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती दिली आहे.
१) पो.स्टे. उमरेड गुन्हे रजि. नं. ३०१ / २०२३ कलम ४५७, ३८० भादवि.
२)पो.स्टे. उमरेड गुन्हे रजि.नं. ३७३ / २०२३ कलम ४५७, ३८० भादवि
३)पो.स्टे. कुही गुन्हे रजि. नं. १५६ / २०२३ कलम ४५७, ३८० भादवि.
४)पो.स्टे. कुही गुन्हे रजि. नं. २५९/२०२३ कलम ४५७, ३८० भादवि.
५)पो.स्टे. बुटीबोरी गुन्हे रजि.नं. ५८७ / २०२३ कलम ४५७, ३८०भादवि.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, दिनेश आधापूरे, मिलींद नांदूरकर, आशिष भुरे, पोलीस नायक नितेश पिपरोदे, विपीन गायधने, अमृत किनगे, रोहन डाखोरे, राकेश तालेवार, राहुल साबळे, चालक पोलीस शिपाई आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड, यांनी पार पाडली.