नवनिर्वाचित सभापती दिशा चनकापुरे यांचा सन्मान   

कामठी :-  कामठी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती दिशा चनकापुरे यांचा कामठी पंचायत समीती कार्यालय येथे विविध सामाजिक संघटन व राजकीय पक्ष यांनी संयुक्तरीत्या सम्मान करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समीती उपसभापती दिलीप वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सम्मान कार्यक्रम घेण्यात आला. या शिष्टमंडळामध्ये युवा चेतना मंच चे प्रा.पराग सपाटे , शिव उत्सव प्रमुख मयूर गुरव ,अक्षय खोपे, कामठी निधी अर्बन बँकेचे संचालक नितीन ठाकरे, एम.आय.एम नागपूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष शकीब रहमान व सहकारी, रामटेक विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटील, दिंव्याग फाऊंडेशनचे सचिव बाँबी महेंद्र , जीवनतंरग बहुउदेशीय संस्थेचे सचिव घनश्याम चकोले, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विविध सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य विषयक बाबींवर चर्चा करण्यात आली. व यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ही या प्रसंगी सभापती दिशा चनकापुरे यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषद च्या 28 नगरसेवकांनी दिली करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी..

Fri Oct 28 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 28 :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराचा विकास हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असलेल्या कामठी नगर परिषद च्या माध्यमातून केला जातो तर कामठी नगर परिषद ला मिळकत असलेल्या घरकर,जलकर यासारख्या विविध संग्रहित करातून कामठी नगर परिषद चा कारभार सुरू असतो अर्थातच नगर परिषद च्या आर्थिक कारभारात महत्वाची बाब म्हणजे नागरिकांकडून येणारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com