संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दिव्यांग व्यक्तीबाबत सर्वसामान्य जनतेत आपुलकी निर्माण होत दिव्यांग बांधवांचा सम्मान व्हावा,त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांग्याच्या प्रति सहानुभूती दाखवत त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना प्रेरित करणे आवश्यक असल्याचे मौलिक प्रतिपादन स्व सरजूप्रसादजी दुबे जनकल्याणकारी बहुउद्देशीय संस्था कामठी चे अध्यक्ष नितु दुबे यांनी संस्थेच्या कार्यालयात आयोजित दिव्यांग सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व्यंगत्वावर मात करीत जीवनाची यशस्वी यशोगाथा गाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळणाऱ्या गीतेश सुखदेवें, चांद शेख यासह आदी दिव्यांगांचा स्व.सरजूप्रसादजी दुबे जनकल्याण कारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सुनिल सीलाम, आसाराम हलमारे,राजेश गजभिये,आकाश भोकरे,आशिष मेश्राम, नरेंद्र कुरील, पम्मी श्रीवास्तव, सतीश यादव,प्राजक्ता वासनिक,अशोक दुबे,सुरज दुबे ,प्रकाश कोकर्डे,आशिष कुशवाहा आदी उपस्थित होते.