संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र :- शीलं परम् भूषणम्।’ असे म्हणतात. सद्वर्तन हाच सर्वांत मोठा अलंकार! प्रामाणिकपणा हा सद्वर्तनातील सर्वांत मोठा गुण आहे. माणूस प्रामाणिक असला, तर त्याच्या हातून वाईट गोष्टी घडतच नाहीत.
प्रामाणिक राहणे हे फारच अवघड असते. त्यासाठी फार मोठे धाडस लागते. पुष्कळ वेळा आपण प्रामाणिकपणाने वागलो, तर आपले नुकसान होऊ शकते, अशी स्थिती असते. पण ते नुकसान स्वीकारण्याची आपली तयारी हवी. तेवढे धैर्य आपल्याजवळ असले पाहिजे.असे धाडस व प्रामाणिकपणा फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो. नागपूर सिटी बस चालक राजेश बनाईत व वाहक उमेश बनाईत है त्यापैकी एक.या दोघांनी आपला प्रामाणिकपणा कायम राखत सिटी बस ने प्रवास करत असलेल्या एका प्रध्यापिकेची बॅग त्यांना परत केली.या बाबत थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 28फरवरी 2023 रोज मंगळवार प्रा. डॉ. वैशाली गणेश भांडारकर हया शीतलमाता मंदिर भांडेवाडी येथून MH 31 CP 7820 या van ने प्रवास करीत असतांना vanchalk सोनू बावनगडे यांनी अजाणतेपणे प्रा. भांडारकर महिला कला महाविद्यालय, उमरेड यांची बॅग गोरक्षण विहीरगाव या ठिकाणी ठेवून दिली. हा प्रकार सिटी बसचालक राजेश बाणाईत व कंडयाक्टर उमेश बाणाईत (बस क्रमांक MH 31 CA 773 खापरी नाका डेपो ट्रॅव्हल साईन ) यांना रोडवर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ती बॅग उचलून बॅग मधे असलेल्या महत्वाच्या कागदपत्रावरून त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य. सन्मानि्य डॉ. लखपती गायकवाड यांच्याशी संपर्क साधीत मॅडम चा दूरध्वनी क्रमांक मिळविला व लगेच ती बॅग त्यांच्या सुपूर्द केली. हरविलेली बॅग मिळताच गणेश भांडारकर व वैशाली भांडारकर तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी राजेशजी मामूलकर व उमेश बाणाईत यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले आहे.