नागपूर :-दिनांक ०४.११.२०२३ रोजी अती, सत्र न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. ६०१ / २०२१ मधील पो. ठाणे अजनी येथील अप क. ३५९/२०२१ कलम ३०२ १४३, १४४ १४७ १४८, १४९, भादवि या गुन्हयातील आरोपी निशांत अरविंद घोडेस्वार वय २२ वर्षे रा. कौशल्या नगर, कल्पतरू बौध्द बिहार जवळ, अजनी, नागपूर यांचे विरुद्ध साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस कलम ३०२, भा.दं.वि. मध्ये आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा, व १०,०००/- रू दंड व दंड न भरल्यास ०२ वर्ष अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी क. ५ संजय मेश्राम वय २१ वर्ष रा. रामबाग, नागपूर याची निर्दोष मुक्तता केली.
दिनांक २३.०७.२०२१ चे २२.०० वा. ने सुमारास पोलीस ठाणे अजनी हदीत कौशल्या नगर, कावरेने घराजवळ अटोमध्ये फिर्यादीचा मुलगा नामे स्वयम सत्यप्रकाश नगराळे वय २१ वर्ष रा. कौशल्या नगर, नागपूर यास (आरोपी क्र. १) निशांत अरविंद घोडेस्वार वय २२ वर्षे २) शिमव उर्फ शक्तीमान शुध्दोधन गुरुदेव वय २१ वर्ष दोन्ही रा. कौशल्या नगर, नागपूर ३) अमन संजय मेश्राम वय २१ वर्ष रा. रामबाग, नागपूर तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन जुन्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीचे मुलास चाकुने मारहाण करून त्यास जिवानीशी ठार केले होते. याप्रकरणी फिर्यादी सत्प्रकाश चरणदास नगराळे वय ५३ वर्ष यानी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द पो. ठाणे अजनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी क्र. २ याचा मृत्यू झाला होता. ईतर २ आरोपींना दिनांक २४,०७,२०२९ रोजी अटक करण्यात आली होती..
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन सपोनि संतोष जाधव यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. पंकज तपासे यांनी तर आरोपी तर्फे ॲड. ओ. जलतारे यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी मनापोअ किर्ती फुकट व सुरेन्द्र लवहाले यांनी काम पाहिले.