मा. न्यायालयातुन आरोपीस शिक्षा

नागपूर :- दिनांक १०.०९.२०२४ रोजी अति सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष पोक्सो न्यायालय) आर.पी पांडे यांनी त्यांचे कोर्टाचे स्पेशल केस क. २७/२०२३ मधील, पोलीस ठाणे वाडी येथील अप. क. ५७६/२०२२ कलम ३७७, ५०६, ३४ भा.द.वि., सहकलम ४, ८ पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील आरोपी १) बादल उर्फ चिंटू जगदीश जिवतोडे वय २० वर्ष २) रविकुमार फुलचंद चवरे वय ३४ वर्ष दोन्ही रा. वाडी, नागपूर यांचे विरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपींना कलम ४(२) पोक्सो अॅक्ट अन्वये २० वर्ष सत्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १०,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०२ वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम ३७७ भा.दं.वी अन्वये १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम ५०६ भा.दं.वी अन्वये ०६ महिने सश्रम कारावासची शिक्षा व प्रत्येकी २,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिनांक १६.११.२०२० चे १ महिन्या पुर्वी पासुन पोलीस ठाणे वाडी हद्दीत राहणाऱ्या फिर्यादी यांचा १२ वर्षीय अल्पवयीन नातु याचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन आरोपींनी त्याला सोबत नेवुन त्याचे सोबत अनैसर्गीक कृत्य केले. फिर्यादी यांनी नातवाला विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्याने फिर्यादीस झालेल्या घटनेबाबत सांगीतले. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे वाडी येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपींना दिनांक १७.११. २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.

गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन मपोउपनि, गोबाडे यांनी कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. आसावरी परसोड़कर व कल्पना पांडे मॅडम यांनी तर, आरोपीतर्फे अॅड. रावराणी व झा यांनी काम पाहिले, सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा, अनिल पोतराजे यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Wed Sep 11 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १२६, मोतीलाल नगर, दिघोरी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मनोज मोतीराम डोर्लोकर वय २८ वर्ष यांनी त्यांनी निसान कंपनीनी मायका कार क. एम. एन ४९ ए.ई १६:०९ किंमती १,२५,०००/- रू. नी नग समोर पार्क करून लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अनोळखी आरोपीविरूध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!